भूम (प्रतिनिधी)- परमार्थ हा रक्तात असावा लागतो कोणीही उठून परमात्म करतो आता असे चालणार नाही. कर्म हाच देव संपत्ती आली तर दया येत तिथे दया येत नाही जिथे दया असेल तिथे संपत्ती दिसुन येत नाही. जिथे दोन्ही आहेत ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र सामनगाव येथील गुरूपीठ आहे .दास महाराज यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर किर्तन सेवा देताना बोलत होते .पुढे बोलताना म्हणाले की अंगातील ताकद खिशातील पैसा संपला की माणसाची किंमत संपली इंदुरीकरांचे कालही आजही आणि उद्याही शब्द खरे आहेत .दहा वर्षांपूर्वी ओवी येत नव्हती माऊलीची कृपा होते काही न सांगता अन्नदान होते साधू बुद्धी देतो कृपा आहे .परमार्थ हा भावनेचा खेळ आहे .या जगात जो खरा बोलतो तो उद्या दिसणार नाही .आमची पिढी संपली की पुढे कीर्तन करणार नाही परिस्थिती तशी आहे .सध्या गणपतीत मध्ये 33 कीर्तन .झाले आहे .33 वर्षे रोडवर केली .परमार्थाची उंची वाढवणे वारकऱ्यांच्या हातात आहे .जे भागवतकार भागवत गीता सांगतात त्यांनी निम्मे पैसे जनावरांच्या चाऱ्याला दिले पाहिजे .दोन मिनिटांचा राग उभ्या आयुष्यातून उठवतो .दोन मिनिटांचा डाग तुम्हाला देवामध्ये आणून बसवतो .चांगलं वागत चला त्याच्यामध्ये देव आहे .असे यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तन सेवा सांगताना सांगितले.
यावेळी सद्गुरु रामदास महाराज, धर्मराज दादा महाराज, रविराज पाटील ,धनंजय सावंत,महेश खुळे डॉ भरत दळवे ,सर्जेराव इंदलकर, बिभीषण महाराज '.पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .
