नळदुर्ग (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांची क्रुरपणे हत्या करणारा औरंगजेब याची जूलूस मध्ये उदात्तीकरण करणाऱ्या घोषणा देवून सर तन से जुदा अशा घोषणा देणाऱ्या जिहादींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले असून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे आणि सर तन से जूदा या घोषणा दिल्यामुळे याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्यावतीने नळदुर्ग शहर बंद करण्यात आले होते.
दि. 8 सप्टेबर 2025 रोजी शहरात महंमद पैंगबर जयंती निमीत्त जूलूस काढण्यात आला होता. या जुलूस मध्ये कांही तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांची क्रुरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेब याची उदात्तीकरण करणाऱ्या घोषणा दिल्या होत्या तर हिंदु समुदायाकडे पाहत सर तन से जूदा अशा धमक्या देणाऱ्या ही घोषणा दिल्या गेल्या. यामुळे अशा जिहादी प्रवतीच्या मानसिकतेचा नळदुर्ग शहरातील सकल हिंदु समाजाकडून निषेध करण्या आला असून अशा घोषणा देणाऱ्या तरुणांचे चित्रीकरण पोलिस प्रशासनाकडे आहे. मात्र गेली दोन दिवस सकल हिंदु समाजाच्या वतीने मागणी करुन ही पोलिस प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने दि. 11 सप्टेबर 2025 रोजी सकल हिंदु समाजाच्या वतीने नळदुर्ग शहर बंद करण्यात आले होते. तर येथील जय भवानी चौकात मुक मोर्चा काढून पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्फत जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून शहरातील शांतता भंग करण्याचे काम होत असून एक प्रकारे दहशत माजविण्याचा प्रयत्न होत आहे. अशा तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन वरीष्ठ पातळीवरुन त्यांच्या घराची ही कसुन चौकशी करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनात सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर सकल हिंदु समाजाच्या बहुसंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत.