नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील माजी नगराध्यक्ष उदय आंबादासराव जगदाळे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचार घेत असताना दि.11 सप्टेबर 2025 रोजी सकाळी साडे दहा च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन आणि नात असा परिवार आहे. सन 2008 ते सन 2010 हा आडीच वर्षाचा त्यांचा नगराध्यक्षाचा कालखंड शहरवाशीयांच्या स्मरणात राहील असा होता. शिवाय पालिकेच्या 55 वर्षाच्या इतिहासात ते सर्वसाधारण गटातून मराठा समाजाचे पहिले नगराध्यक्ष बनले. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे ते कटटर समर्थक होते.

उदय जगदाळे गेल्या कांही दिवसापासून आजारी होते. मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असताना मरण पावले. दरम्यान त्यांच्या नगराध्यक्षाच्या काळात शहरात मोठया प्रमाणात मोठी कामे झाली आहेत, आज ही त्यांनी शहरात केलेली विकास कामे शहरवाशीयांच्या स्मरणात राहतील असेच आहे. कारण येथील राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी पाहता या राष्ट्रीय महामार्गाला त्यांनीच दुसरा पर्यायी मार्ग बनवून नानीमॉ रोड ते कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालया पर्यंत पर्यायी मार्ग करुन राष्ट्रीय महामार्गावर होणारे आपघात आणि मृत्यूचे प्रमाण थांबले. पालिके मध्ये धडाडीचे निर्णय घेणारे नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या कडे पाहीले जात असत. त्यांच्या काळात व्यंकटेश नगर, रामलिला नगर, राष्ट्रीय महामार्ग ते भीम नगर, राष्ट्रीय महामार्ग ते नगर पालिका आणि हुतात्मा स्मारक समोरुन राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचे मोठे रस्ते करण्यात आले. हिंदु मुस्लीम समाजामध्ये सर्व समावेशक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात असत. त्यांची अंत्य यात्रा शुक्रवार दि. 12 सप्टेबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरातून निघून अलियाबाद स्मशानभूमीत पार्थीवावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.

 
Top