नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे दि. 17 सप्टेंबर रोजी 78 वा मराठवाडा मुक्ती दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय व निमशासकीय कार्यालयावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यावेळी ध्वजरोहणाचा मुख्य कार्यक्रम नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर सकाळी 9.45 वा. पार पडला. याठिकाणी नळदुर्गचे अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथे दि. 17 सप्टेंबर रोजी 78 वा मराठवाडा मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्ती आंदोलनात नळदुर्ग हे महत्वाचे ठिकाण होते. निजामाच्या जोखडातुन मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्ती आंदोलनात नळदुर्ग शहराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन नळदुर्ग शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मराठावाडा मुक्ती दिनानिमित्त शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, जि. प. च्या सर्व शाळा, अंजनी प्रशाला, धरीत्री विद्यालय, नॅशनल मराठी शाळा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, नगरपालिका, हुतात्मा स्मारक, चावडी चौक व नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.
सकाळी 9.45 वा नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर नळदुर्गचे अप्पर तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यावेळी भाजपचे नेते सुशांत भुमकर, भाजपच्या नळदुर्ग ग्रामिण मंडळच्या तालुका अध्यक्षा रंजना राठोड, विलास राठोड, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, विनायक अहंकारी,दत्तात्रय कोरे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकुर,किशोर नळदुर्गकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, बंडप्पा कसेकर,भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, शहर भाजपचे उपाध्यक्ष विशाल डुकरे, अक्षय भोई, भाजपचे माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, धीमाजी घुगे,शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे, देवानंद बनसोडे,अमर भाळे, पुरातत्व विभागाचे नळदुर्ग किल्ल्याचे इन्चार्ज नागनाथ गवळी तलाठी वायचळ, तलाठी कार्यालयाचे फुलारी, जि. प. प्रशालेचे मुख्याध्यापक निजाम इनामदार यांच्यासह जि. प. प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.