भूम (प्रतिनिधी)-  भूम येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत रवींद्र हायस्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकवला आहे.

सदरील स्पर्धेत  17 वर्षीय वयोगटात 48 किलो वजनी गटात अथर्व वाळके, 45 किलो वजनी गटात गिरोको रोमन या कुस्ती प्रकारात  प्रज्वल वाघमोडे , 45 किलो वजनी गटात फ्रीस्डाइल कुस्ती प्रकारात रोहित जाधव, 51किलो वजनी गटात वैभव साठे,  60 किलो वजनी गटात रोहित माने तसेच 14 वर्षे वयोगटात 52 किलो वजनी गटात आर्यन ओव्हाळ,  38 किलो वजनी गटात ज्ञानेश्वर गाढवे या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकवत रवींद्र हायस्कूलचा यशाचा आलेख वाढवला आहे. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पात्र विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्रशिक्षक अमर सुपेकर  (कबड्डी कोच) यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी आर.डी.सुळ,  मुख्याध्यापक उत्तम सुरवसे , उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे  तसेच धनंजय पवार ,भागवत लोकरे , रविंद्र प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top