भूम (प्रतिनिधी) - निपाणी तालुका भूम येथील महेबुब पठाण (मुजावर) यांचे सोमवारी दि ८ ऑगष्ठ २०२५ रोजी सकाळी 9:00 वा वृद्धाप काळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर गावीच अंत्यविधी करण्यात आला.
भाजपचे मुस्तफा महेबूबखा पठाण याचे ते वडिल होते, त्यांना शाळे विषयी आस्था असल्याने त्यांनी निपाणी जिल्हा परिषद शाळेसाठी १ एकर जमीन मोफत दिली आहे. त्यांच्या मागे 1 मुलगा 5 मुली मुस्तफा महेबुबखां पठाण, हाफीजा मुजावर, जरीना पठाण, दवलत शेख, मुमताज पठाण, शफीया मुजावर, जावई ईवाई नातवंडे असा मोठा परिवार आहे .
