धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य इतर मागास वित्त व विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी विविध स्वयंरोजगाराच्या योजना राबविण्यात येतात.याच अनुषंगाने थकीत कर्ज प्रकरणांसाठी एक विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे.

महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणांमध्ये संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ओटीएस) योजना 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे,असे आवाहन ओबीसी महामंडळ,धाराशिवच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती व्ही.डी.लहारे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 02472-223863 वर संपर्क साधावा.

 
Top