धाराशिव (प्रतिनिधी)- 8.9.2025 रोजी धाराशिव तालुका क्रीडा संयोजन समिती व गांधी विद्यालय चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कब्बडी स्पर्धेचे भव्य उद्घाटन गांधी विद्यालयाच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद व विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विक्रम पाटील यांच्या हस्ते कब्बडी सामन्याला सुरुवात झाली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका संयोजक बिभीषण पाटील, विस्तार अधिकारी बापू शिंदे, केंद्रप्रमुख चाऊस सर, महात्मा गांधी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जलराज चोबे, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव योगेश थोरबोले, जिल्हा कब्बडी असोसिएशनचे सहसचिव मोहन पाटील व खजिनदार अमर राऊत, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गुणवंत काळे तसेच गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव,प्रकाश अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत 14,17,19 वर्ष वयोगातील 67 संघाच्या जवळपास 800 मुलानी सहभाग घेतला.

आपल्या मनोगतात विक्रम पाटील म्हणाले की, “आजच्या आधुनिक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाल्यास ते ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करतील. मोबाईलला दूर ठेवून तरुणाई मैदानाकडे वळत असल्याचे पाहून समाधान वाटते.” स्पर्धेचे पंच म्हणून पोपट पुरी,स्पर्धा निरीक्षक शाम जाधवर,पवन वाठवडे,दिलीप चव्हाण,रोहन जगताप व राठोड सर,राजकन्या शिंदे, बाबा जगताप,पंच प्रमुख हजु शेख आदी दक्षता घेत आहेत. कब्बडी मैदानावर झालेल्या या रंगतदार सुरुवातीमुळे खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतून अनेक दर्जेदार खेळाडू घडून जिल्हा व राज्यस्तरावर नाव रोशन करतील, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

 
Top