उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा येथे नगरपालिकेच्या वतीने आयोजित “माझा वार्ड माझी जबाबदारी “ या सार्वजनिक उपक्रमाचा शुभारंभ खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी रणधिर भाऊ पवार,अमोल बिराजदार, विजयकुमार नागणे,महादेव अण्णा कोराळे, अप्पराव गायकवाड ,सुधाकर पाटील, अजिंक्य बापू पाटील, मुख्याधिकारी जाधवर आदी. मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून त्या त्या वार्डातील स्थानिक प्रश्न अडचणी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी व्हाट्स अप ग्रुप च्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. लाईट, पिण्याचे पाणी, नाली सफाई तसेच अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे. इतर नगरपालिकेने देखील याचा आदर्श घ्यावा व उपक्रम राबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी उमरगा शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
