वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील जाणकापूर गाव गेल्या आठ दिवसांपासून मांजरा नदीच्या प्रचंड पुरामुळे मोठ्या संकटात सापडले आहे. गावातील वीस कुटुंबे पाण्याखाली गेली असून शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पारगाव-जाणकापूर जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. नदीवरील पुलाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे गावात ये-जा करणे धोकादायक झाले आहे.

अशा कठीण परिस्थितीत भूम-परंडा-वाशीचे आमदार तानाजीराव सावंत यांचे पुतणे तसेच डीसीसी बँकेचे संचालक विक्रम उर्फ केशव सावंत यांनी पुन्हा जाणकापुरात भेट दिली. आठ दिवसातली ही त्यांची तिसरी भेट होती. पुल व बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी राऊळ यांना तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना फोनवरूनच दिल्या. “निधीची अडचण आल्यास तानाजी सावंत साहेबांच्या स्वखर्चातूनही मदत करण्यात येईल,” अशी ग्वाही सावंत यांनी दिली. पूरग्रस्त कुटुंबांचे दुःख कमी करण्यासाठी विक्रम सावंत यांनी स्वतः खाद्यपदार्थ किटचे वाटप केले. तसेच नागरिकांना कोणत्याही समस्येसाठी शासकीय निधीची वाट न पाहता मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, नगरसेवक नागनाथ नाईकवाडी, शिवहार स्वामी, प्रवीण गायकवाड, विकास तळेकर, उद्धव साळवी, कुंडलिक आखाडे, पोपट सुरवसे, अशोक जाधव, राजु कोळी, समाधान मोटे, चेतन तातुडे, विलास खवले, तानाजी कोकाटे, राहुल आडमुटे, बायसाबाई पोनकुले, दीपक आखाडे, बाबा हारे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पूरामुळे गावाचा पूल तुटला, रस्ता वाहून गेला, परंतु गावकऱ्यांशी असलेली सावंतांची नाळ अजिबात तुटली नाही, हे पुन्हा एकदा त्यांच्या भेटीतून स्पष्ट झाले.

 
Top