धाराशिव (प्रतिनिधी)-परंडा व भूम तालुक्यातील महापुराने गावोगाव भीषण परिस्थिती निर्माण केली होती. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने शेकडो घरं जलमय झाली. अनेकांना घरदार सोडून सुरक्षिततेसाठी धाव घ्यावी लागली, तर शेकडो नागरिक पाण्याच्या कवेत अडकून पडले होते. या भीषण परिस्थितीत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे NDRF, आर्मी व जिल्हा प्रशासनासह दोन दिवस अखंड प्रयत्न करत सुमारे 300 नागरिकांची सुटका करण्यात यशस्वी ठरले. या बचाव कार्य मदत करत व स्वतः मैदानात उतरत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अनेक माता-भगिनी वृद्ध व व नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप व सुरक्षित स्थळी पोहोचवले. यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी संकट समयी मदत करणे हे माझे कर्तव्यच होते या ठिकाणी माझे कुटुंबीय समजून मी सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढले असे म्हटले आहे.
या मोहिमेत लाखी (12), कपिलापुरी (9), वडनेर (4), देवगाव (26), वाघेगव्हाण (173), कारंजा (2), इट (1), ढगपिंपरी (8), रुई (13), नालगाव (19), तांबेवाडी (6), मुंगशी (12), उळूप (6), जांब (1), रामेश्वर (1), ईडा (7) या गावांतील नागरिकांची सुटका करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाचा तातडीचा प्रतिसाद आणि जवानांचे धाडस यामुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचले. या शौर्यपूर्ण कार्यामुळे पुरग्रस्त भागात दिलासा आणि सुरक्षिततेची भावना पसरली आहे.यावेळी खासदार ओम प्रकाश राज निंबाळकर यांनी एनडीआरएफ व मदत कार्यातील सैनिकांचे मनापासून आभार व्यक्त केले