उमरगा (प्रतिनिधी)- येथील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या सुविद्य पत्नी सुप्रिया दिलीप गरुड यांचे दुःखद निधन झाले. त्यानिमित्त माजी मंत्री तथा भाजपाचे लातूर ग्रामीण हे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियाचे नाईचाकूर तालुका उमरगा येथील निवासस्थानी जाऊन सांत्वन केले.
यावेळी पत्रकार प्रा.बी. व्ही. मोतीपवळे, श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, विठ्ठल साई साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन सादिकमिया काजी, जि.प.चे माजी सभापती गोविंदराव पवार, विठ्ठल साई कारखान्याचे संचालक केशवराव पवार. धाराशिव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, शेषराव पवार, रूकमागंद पवार, जयहिंद पवार, सिद्धेश्वर माने, किसनराव कांबळे, गणेश पाटील, राजेंद्र डिगोळे, विठ्ठल चिकुंद्रे, उपसरपंच शिवाजीराव पवार, भीमराव पवार, सिताराम मारेकर, सतीश पवार, यशपाल कांबळे आदि उपस्थित होते.