तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळी (बु) येथील ग्रामसेवक एच.के. पठाण यांची बदली होऊनही ते अद्याप पदावर कायम असल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.
पठाण हे 11 सप्टेंबर 2019 रोजी आरळी (बु) येथे रुजू झाले. होते गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांची 18 ऑगस्ट 2025 रोजी बदली आदेश काढून, त्यांच्या जागी ग्रामसेवक पी.व्ही. नलावडे यांची नियुक्ती केली.मात्र पठाण यांनी पदभार सोडण्यास नकार दिला आहे. यापूर्वी स्वराज्य पक्षाने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, “तात्काळ बदली अमलात आणावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल“ असा इशारा दिला होता. तरीदेखील ग्रामसेवक पठाण पद न सोडता कार्यरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गटविकास अधिकारी बदली आदेश असूनही कारवाई का करत नाहीत? ग्रामसेवकाचे संरक्षण कोण करत आहे? या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.