धाराशिव  (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यात मागच्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिराऊन नेला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत द्यावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.23 सप्टेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या दिवसात असे नमूद करण्यात आले आहे मागच्या काही दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेला घास विसर्गाच्या लहरीपणामुळे निघून गेला आहे तसेच शेतकऱ्यांची जनावरे दावणीलाच मृत्यू पडलेली आहेत शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरूर बऱ्याच गावामध्ये घराची कर्जत झाली आहे तर घरातील धान्याची देखील भिजून नासाडी झालेली आहे. त्यामुळे तातडीने शासनाने मदत करावी. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात येत शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी  एक लाख रुपये मदत जाहीर करावी. शिवाय मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे जमिनी खरडवून गेल्या आहेत. त्यामुळे पुढील हंगामात देखील पिके घेणे शक्य नाही. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे रहावे, अशी मागणी केली आहे. यावर धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद वीर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव तथा जिल्हा बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, तालुका सरचिटणीस विकास ढवळे, प्रदीप घुटे, दत्तात्रय घुटे, सर्फराज काझी, आयुब पठाण, अमोल देटे, ॲड गणपती कांबळे, लक्ष्मीकांत खरपे, माणिक सुर्यवंशी, शशिकांत खटके, परिक्षीत खटके, आयाजजखान पठाण, अकबर शेख, रणजीत गुंड, अशोक बनसोडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष भारत काटे, अक्षय वीर, जहांगीर शेख, शहाजी राठोड, इर्शाद अब्बास, विक्रम मिरगणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या होते.

 
Top