तुळजापूर (प्रतिनिधी)- येथे तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव मालाविषयीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे करिता परिसरात गस्त करीत असता. त्या अनुषंगाने गुरुवार दि. 25 सप्टेंबर रोजी पेट्रोलींग करीत असताना पाच ते सहा इसम झाडी व गवताचा आडोशाला लपून तुळजापूर मध्ये येणाऱ्या भाविकांना अडवून लुटत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने या दरोडेदोरांना जेरबंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सपोनि कासार व पथक यांना तुळजापूर लातूर रोड, बायपास रोड जवळ तुळजापूर या ठिकाणी पाच ते सहा इसम झाडी व गवताचा आडोशाला लपून तुळजापूर मध्ये येणाऱ्या भाविकांना अडवून लुटत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. नमूद पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता सहा इसम लपून आडोशाला बसलेले दिसले.
पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर छापा घातला असता त्यांचेकडे एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी सुरा, मिरची पावडरची पुडी असा मुद्देमाल मिळून आला. त्यामुळे सदर इसम दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असल्याचे पोलिसांची खात्री झाल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पंचनामा करून त्यांचे जवळील वर नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर इसमावर दरोड्याचा प्रयत्न करणे या याबाबतचा तुळजापूर पोलिस स्टेशनध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईकामी पोस्टे तुळजापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार,पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोअं रत्नदीप डोंगरे, नवनाथ गुरव यांचे पथकाने केली आहे.