तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कर्नाटकातून दर्शनासाठी खाजगी वाहनांनी  आलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहरातील हाडको वाहनतळात वाहने लावण्यास  जागा उपलब्ध असताना देखील, धाराशिव रोडवरील बायपास पुलाजवळ तैनात पोलिस अधिकारीनी या भाविकांना “तिकडेच जावा ” असे सांगत परत पिटाळले.त्यामुळे  कर्नाटक भाविकांना मंदीराकडे जावे कसा असा प्रश्न पडला अखेर दीड दोन किलोमीटर  पायपीट  करीत शहरात भाविकांना यावे लागले 


यामुळे देवीदर्शनासाठी आलेल्या भाविकांची ससेहोलपट झाली. हाडको व अग्निशमन केंद्राच्या वाहनतळावर गाड्यांसाठी मोकळी जागा असतानाही भाविकांना अडवले गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

यामध्ये  दलालांचा माध्यमातून कमाई कोन करते असा  संशय व्यक्त होत असून, काही वाहनचालकांनी दलालांना पैसे देऊन गाड्या पुन्हा वाहनतळात उभ्या केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा प्रकार नवरात्रोत्सवातील “बंदोबस्त“ पेक्षा “खेळ चालू आहे” या मालिकेला साजेसा झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडे चौकशीची मागणी होत आहे. पोलिसांच्या कृतीमुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठाची प्रतिमा धुळीत मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच सीमेजवळ महामार्ग पोलिसांकडूनही कर्नाटकी वाहनांची लूट होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामुळे शारदीय नवरात्रोत्सवात प्रथमच दर्शनाऐवजी भाविकांना “लक्ष्मी-दर्शन” करावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकारावर बोलताना कर्नाटकातील भाविक म्हणाले कि “आम्ही देवदर्शनासाठी आलो,दलालांच्या खेळात अडकण्यासाठी नाही!” अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांन मधुन व्यक्त केली जात होते श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येणारा भाविक धार्मिक वृत्तीचा असतो तो गुन्हेगार वृत्तीचा नसतो तरी भाविकांना तिर्थक्षेञी मिळालेली वागणुक बाबतीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कडे ञस्त भाविक तक्रार करणार असल्याचे बोलत होते वाहनतळ नियोजनात प्रथम हाडको भागातील दोन वाहनतळे नंतर अग्नीशमन केंद्रातील वाहनतळे वाहनांनी भरायाचीनंतरच इतरञ वाहने पाठवायाचे असे नियोजन असताना घाटशिळ घाट धाराशिव बायपास येथुन ही वाहनांना शहरात प्रवैश करु दिला नाही त्यांना लांबचा वाहनतळा कडे पाठवल्याचे समजते. आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होते का, की परराज्यातील भाविकांना वा-यावर सोडले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top