धाराशिव (प्रतिनिधी) येथील रहिवाशी असलेल्या आणि आर्टस् ॲन्ड कॉमर्स कॉलेज, करेपूर येथे वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध लेखिका प्रा. अरुणा गंगाराम पोटे यांना दि इंग्लिश एज्युकेटर्स सोसायटी अंबाजोगाई यांच्याकडून दरवर्षी दिला जाणारा मुक्ता साळवे राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
त्या शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे असे दि इंग्लिश एज्युकेटर सोसायटीचे संस्थापक प्रा.डॉ.रमेश लांडगे यांनी म्हटले आहे. प्रा. अरुणा पोटे यांनी Problem and prospects of women entrepreneur in Aurangabad district या विषयावर यशस्वी संशोधन केले आहे. या संशोधनासाठी त्यांना राजीव गांधी नॅशनल फेलोशिप देखील प्राप्त झालेली होती. त्यांना कोल्हापूर येथे 2017 मधील फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अनेक क्रमिक पुस्तकांचे लेखन देखील केलेले आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधणेबंधाचे लेखन आणि सादरीकरण केलेले आहे. त्यांनी अनेक महाविद्यालयामध्ये बँकिंग आणि स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केलेले आहे. याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते 6 ऑक्टोबर 2025 रोजी बीड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये वितरित करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आर्ट्स अँन्ड कॉमर्स कॉलेज, कडेपूरचे प्राचार्य डॉ.एल .जी जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.