तुळजापूर (प्रतिनिधी)- मुसळधार पावसाने तुळजापूर तालुक्यात हाहाकार माजवला असून, अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना शिवसेनेच्या वतीने गावोगाव मदतीचा हात पोहोचत आहे.

कुन्सावळी, बोळेगाव, मानेवाडी नंतर आता वडगाव देव येथेही पूरग्रस्त कुटुंबांना शिवसेनेकडून किराणा किटचे वाटप करण्यात आले. या मदतकार्य  तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या मार्गदर्शन खाली   संभाजी नेपते, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, आप्पा पाटील, राहुल शिंदे, विकास जाधव, मीनाताई सोमाजी, राधाताई घोगरे, कपिल देवकते, रवि देवकते अदि शिवसैनिक करीत आहेत.


 
Top