उमरगा (प्रतिनिधी)-  यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. त्यादृष्टीने हंगाम 2025-26 मध्ये 5.11 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठरवून परिपूर्ण तयारी आम्ही केलेली असून भागातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार आहोत. गळीत हंगाम 2025-26 चा बॉयलर प्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम पुढील आठवडयात होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती माजीमंत्री तथा कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी सभेच्या अध्यक्षपदावरुन बोलताना दिली.

पुढे बोलताना चेअरमन पाटील म्हणाले की, कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊसास जास्तीचा भाव देणे यासाठी साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यानुसार कारखाना साईटवर 60 केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प उभारणी करण्यास मंजुरी मिळालेली आहे. 

सदर सभेत सर्व उपस्थित सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयांना टाळयांच्या गजरात मंजुरी दिली. विषय पत्रिकाचे वाचन प्र. कार्यकारी संचालक. एस. आर. गवसाणे यांनी केले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, धाराशिव जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, उमरगा बँकेचे चेअरमन शरण पाटील संचालक, ॲड. सुभाष राजोळे, केशवराव पवार, रामकृष्णपंत खरोसेकर, शब्बीर जमादार, दिलीपराव पाटील, संगमेश्वर घाळे, शरणप्पा पत्रिके, राजीव हेबळे, माणिकराव राठोड, दत्तू भालेराव, श्रीमती मंगलताई गरड, सौ. इरम्माताई स्वामी, शिवलिंग माळी, ॲड. संजय बिराजदार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक विठ्ठलराव बदोले यांनी केले. सुत्रसंचालन केन अकौंटंट राजु पाटील यानी केले.

 
Top