भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये कुमारी समृद्धी संतोष राऊत व श्लोक संदीप शिंदे हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. याप्रसंगी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांचा लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ भूम या संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे मोटे तसेच सचि सतीश देशमुख, प्रशालेचे मा.मुख्याध्यापक माधव भोसले व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अभिनंदन केले.
