उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील लातूर - उमरगा रोडवरील नारंगवाडी पाटी जवळ दुचाकी - इनोवाचा अपघात होऊन सावळसूर येथील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 3 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

लातुर - उमरगा रोड वरुन सावळसूर येथून नारंगवाडीच्या दिशेने दिनांक 3 डिसेंबर रोजी  जाणा- या दुचाकी क्रं. एमएच 25 जे 5220 ला पाठीमागून येणाऱ्या इनोवा कार क्रमांक  एमएच 12 एक्सएक्स 3713 ने जोराची धडक दिल्याने दुचाकी वरुन प्रवास करणाऱ्या आई भिमाबाई गणपती बिराजदार वय 62 व प्रेमानाथ गणपती बिराजदार वय 45 राहणार सावळसुर हे गंभीर जखमी झाले.

सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथील अपघातग्रस्ताच्या मदतीला जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य  महाराज संस्थान नाणीज धामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उप जिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी केले असता भिमाबाई गणपती बिराजदार यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांचा मुलगा प्रेमनाथ यास पुढील उपचाराकरीता दाखल करुन घेण्यात आले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषेराव लवटे यांनी दिली.


 
Top