कळंब (प्रतिनिधी)- राज्यातील सर्वच बस स्थानकावर ती असलेल्या आस्थापनाधारक यांच्या भाड्यावरती आकारण्यात येणारी 18 % जीएसटी परिवहन विभागाने कमी करावी अशी मागणी कळंब येथील बस स्थानकातील आस्थापनाधारकाने आगार प्रमुख यांच्यामार्फत विभाग नियंत्रक व परिवहन मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे .अशा आशियाचे निवेदन कळंब चे आगार प्रमुख एस .डी . खताळ यांना दिले आहे .

या निवेदनात म्हटले आहे की केंद्र व राज्य सरकारने विविध वस्तू व सेवा यांचे वरील जीएसटी कमी केलेला आहे . मात्र राज्य परिवहन महामंडळाने  आस्थापना भाड्यावरील कुठल्याही पद्धतीने जीएसटी कमी केलेला दिसत नाही . सध्या मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे शेतीमालासह इतर व्यवसायिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे . त्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र सध्या शुकशुकाट आहे त्यातच भाड्यावर 18% जीएसटी भरणे व्यापाऱ्यांना मुश्किल झाले आहे . तरी परिवहन विभागाने याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही या निवेदनात केली आहे . या निवेदनावर आस्थापनाधारक रुपेश कोठावळे ,सोमनाथ सुरवसे , दत्तात्रय उमाप , सदाशिव घिसरे, विकास मुळीक, दिलीप चाळक ,बाळासाहेब चोरघडे , राजाभाऊ चाळक सह  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top