भूम (प्रतिनिधी)- मौजे साडेसांगवी येथे शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पूरग्रस्तांसाठी मदतकार्य राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत गावातील पूरग्रस्तांना कपडे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पूरपाण्यामुळे गावात झालेली घाण लक्षात घेऊन स्वयंसेवकांनी श्रमदानाद्वारे स्वच्छता मोहीमही राबविली. या मदत कार्यात विद्या विकास महामंडळ, पाथरूडचे सहसचिव तथा शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. तानाजी बोराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. नितीन पडवळ, प्रा. श्यामसुंदर आगे, प्रा. गंगाधर काळे, प्रा. मंगेश खराटे, प्रा. सुर्यवंशी, ग्रंथपाल श्री केशव बोराडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याची प्रशंसा केली.