धाराशिव (प्रतिनिधी)- श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दि. 27 सप्टेंबर रोजी परिमल मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरण पार पडली. या सभेत सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
या सभेला संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अभय शहापूरकर, यशदा मल्टिस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते, मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके, सहकार अधिकारी मधुकर जाधव, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, संस्थेचे माजी अध्यक्ष व्यंकटेश कोरे, संचालक सतीश सोमाणी, सहकार क्षेत्रातील तज्ञ संदीप पाटील, संचालक ॲड.सचिन मिनियार, चार्टर अकाउंटंट एकनाथ धर्माधिकारी, दीपक भागभाते, मल्टीस्टेटचे सीईओ राजकुमार जाधव, अरविंद गोरे जिल्हा पतसंस्थेचे देविदास कुलकर्णी, योगेश कुलकर्णी सिद्धिविनायक कारखान्याचे संचालक प्रतिक देवळे, श्रावणी पतसंस्थेचे दाजी आप्पा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, 14 वर्षांच्या कालावधीत श्रीसिद्धिविनायक परिवारातील या संस्थेने 50 हजार सभासदांचा टप्पा गाठला असल्याचे सांगितले तसेच 250 कोटींच्या ठेवी आणि 133 कोटींचे कर्जवाटप करत संस्थेने 350 कोटींचा व्यवसाय उभारला आहे. यावेळी डॉ.अभय शहापूरकर, संदीप पाटील, सुधीर सस्ते यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक देवळे यांनी केले. तर गजानन पाटील यांनी आभार मानले.