धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता कॉपोरेट ऑफीस, समर्थ नगर धाराशिव येथे जिल्हयातील सर्व प्रमुख गुळ पावडर कारखाना चालकांची बैठक संघटनेचे अध्यक्ष ॲड व्यंकट गुंड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये आगामी हंगाम 2025-26 मध्ये गाळपास येणाऱ्या उसासाठी प्रती टन रु. 2400/- भाव देण्यात ठरले असुन मागील 3 वर्षापासुन गुळ पावडर चे भाव खुप कमी झाल्यामुळे तसेच गुळ पावडरचे अतिरिक्त् उत्पादन झाल्यामुळे बाजारात मागणीपेक्षा पुरवठा अधिकचा होत आहे. पर्यायी मालाची साठवणुक करुन शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी माल तारण करुन पैसे उपलब्ध करावे लागत आहेत. त्यामुळे खर्चाचा अतिरिक्त् बोजा कारखानदरीवर पडत आहे. इतर कारखान्यासारखी विजनिर्मिती व इथेनॉल उत्पादन होत नसल्यामुळे कारखाने तोटयात आहेत.
यामुळे चालु हंगामात शेतकऱ्यांना 2400/-रु प्रती टन भाव देण्याचे सर्वानुमते ठरले आहे. या बैठकीस सिध्दीविनायक ग्रीनटेक कारखान्याचे चेअरमन दत्तात्रय कुलकर्णी, डी.एन.एस.एफ.ऐ. व यशवंत ॲग्रो प्रा.लि. एम.डी. विजय नाडे, मोहेकर ॲग्रो चेअरमन हणुमंत मडके, एन.व्ही.पी. शुगर्स चेअरमन नानासाहेब पाटील, रुपामाता पॉवर लि. एम.डी. अजित गुंड, हातलाई शुगर्स चेअरमन अभिराम पाटील, तुळजाई शुगर्स एम.डी. अदित्य् काळे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.