तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या राजेशाही महाद्वारासमोरील परिसर भाविकांसाठी धोकादायक बनला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

महाध्दारासमोर सांडपाणी वाहून जाण्यासाठी छोटी नाली असून त्यावर झाकण नाही.शहरातील विद्युत प्रवाह वारंवार खंडीत होत असल्याने रात्रीच्या वेळी भाविकांना मोठा धोका होण्याची शक्यता आहे. भवानी रोडवरील पायऱ्यांवर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण असुन त्यातच दगडी रस्ता खचल्याने मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यातून जाणाऱ्या भाविक व वाहनांना अपघाताचा धोका होवू शकतो. भाविकांची वाढती संख्या आणि श्रीक्षेत्राचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, हा परिसर तातडीने धोकामुक्त व सुस्थितीत करावा, अशी स्थानिक व भाविकांची प्रशासनाकडे मागणी आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
Top