तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी धर्मादय सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन देवुन केली आहे.
येथील श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ न्यास नोंदणी क्र. -136 या संस्थेच्या कारभारात गंभीर अनियमितता व नियमबाह्य आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करत मंडळातील काही सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मंडळाचा कारभार योग्य रीतीने न चालता केवळ काही मोजक्याच लोकांच्या अखत्यारीत ठेवला जात आहे. संस्थेच्या उत्पन्न-खर्चाचा योग्य हिशेब सादर केला जात नसून, मंडळातील सर्व सदस्यांच्या संमतीशिवाय निर्णय घेतले जात आहेत. सदस्यांनी पुढे असा आरोप केला आहे कीपुजारी मंडळाच्या निवडणुका नियमाप्रमाणे घेतल्या जात नाहीत.आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव असून, सदस्यांना संपूर्ण माहिती दिली जात नाही.न्याय मंडळाकडे संस्थेविरुद्ध अनेक तक्रारी दाखल असून त्यावर चौकशीची आवश्यकता आहे. सदर प्रकरणी धर्मादाय सहायक आयुक्त, धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी व सर्व सदस्यांचा विश्वास जपण्यासाठी स्वतंत्र चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.