तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर सह तालुक्यात विघ्नहर्ता श्रीगणरायाचे आगमान बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात झाले.

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील मंडळीनी बाजारपेठेत सकाळपासूनच घरगुती  गणेशमूर्ती, सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती आणुन विधीवत प्रतिष्ठापना केल्या. दयावान युवा मिञ मंडळाची 18 फुटी बेटी बचाव बेटी पढाव संदेश देणारी गणेशमुर्ती गणेश भक्तांचे आकर्षण केंद्र बिंदू ठरत ही मुर्ती पाहण्यासाठी प्रथम दिनापासुन जिल्हापरीषद मुलांचा शाळा परिसरात गर्दी होत आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील श्रीगणेश मुर्तीची संभळाचा कडकडाटात मंदीरात श्रीगणेश विहारात विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी दिनेश निकवाडे, नागेश शितोळे, ओंकार काटकर, सुधीर कदम, ऋषभ रेहपांडे, उमेश गुंजाळ, दयानंद जोगदंड यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दयावान युवा गणेश मंडळाने 18 फुटी गणेश मुती प्राणप्रतिष्ठापना बुधवारी पहाटे केली. पावणारा गणपतीची माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व त्यांच्या सौभाग्यवतीचा हस्ते पुजन करुन करण्यात आली. शहरातील रणसम्राट, अंबिका, दिपक, छञपती संभाजी सह अनेक  मोठ्या मंडळांनी सार्वजनिक गणेश मंडळांनी साधेपणाने प्रतिष्ठापना केल्या. यंदा शहरात गणेश मंडळांनी भव्य आकर्षक उंचीचा श्रीगणेश मुर्ती प्रतिष्ठापना केल्या. बचे कंपनीने पारंपारिक वाद्य स्वता वाजवुन गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली.  

शहरात घाटशिळ परिसरात लहान, मोठ्या श्रीगणेश मुर्त्या विक्रीस आल्या होत्या. येथे खरेदीसाठी सकाळी एकच झुंबड उडाली होती. गणेश आगमनासोबतच त्याची प्रतिष्ठापना आणि पूजेसाठी आवश्यक असलेल्या फुले, दूर्वा, फळे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.

 
Top