कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील खोंदला गावात जियो मोबाईल कंपनीचा टॉवर असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मोबाईलधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोंदला गावात गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे, या समस्येने 'टॉवर आहे नावाला, मात्र रेंज नाही गावाला', अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आल्याची खोंदला गावातील घटना समोर आली आहे.

गावात जियो मोबाईल कंपनीचा टॉवर असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मोबाईलधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेंज मिळविण्यासाठी ग्राहक रेंजचा शोध घेत आहेत. येथे काही वर्षांपूर्वी जियो कंपनीने टॉवर कार्यान्वित केला आहे. येथे खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जियो कंपनीने टॉवर उभारला आहे.मात्र टॉवर लहान आणि जियो कंपनीचे ग्राहक अधिक वाढल्याने नेट धीम्या गतीने चालत आहे. 4 जी, 5 जी'च्या नावावर महागडे रिचार्ज ग्राहकांच्या माथी मारली जातात .   मात्र नेट टूजी अवस्थेत चालत असल्याने ग्राहक पूर्ण वैतागले आहेत.

यामुळे ग्राहकांचा पैसा वाया जाऊनही नेटचा फायदा मिळत नसल्याने मोबाईल कंपनीवर नाराजी दिसून येत आहे. कळंब शहर व परिसरात कोणत्याच मोबाईल कंपनीची पुरेशी रेंज साई नगर,द्वारका नगरी आशा भागात नसल्याने सीमकार्ड कोणत्या कंपनीचे वापरावे, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे. येथील जियो कंपनीचा टॉवर गावातील वीज गुल होताच त्याचे नेटवर्क गायब होते. त्यामुळे येथील टॉवरला स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर अथवा जनरेटरची व्यवस्था करावी, अशी मागणी त्रस्त नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गावात जियो कंपनीचा टॉवर उभारून काही वर्षे लोटली गेली. मात्र येथे टॉवर असून नसल्यासारखी परिस्थिती आहे. कंपनीच्या वरिष्ठांनी दखल घेत मोबाईलधारकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी जियो ग्राहकांच्या वतीने केली जात आहे.


 
Top