तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील मंदीरच्या पाठीमागील आराधवाडी, भिमनगर मधिल डोंगर भाग व चढउतारातील भाग असणाऱ्या या भागातील विद्युत साधने दुरुस्ती करण्यास कुणीही न फिरकत नसल्याने या भागात या परीसरातील बऱ्याच दिवसांपासून बंद स्वरुपात असणाऱ्यां रोडलाईट, खांबावर वाढलेले झाडे- झुडपे, वेल यामुळे सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांनी स्वखर्चातून बंद स्वरुपातील रोडलाईट रस्त्यावरील पथदिवे दुरुस्ती करुन चालू करून दिले.
डीपीतुन राञभर ठिणग्या !
आरादवाडी भागातील डीपीवर राञभर स्पार्क ठिणग्या उडत असल्याने या भागातील रहिवाशांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण होवुन येथील रहिवाशांनी राञ जागुन काढली. श्रीगणेशोत्सव सह सणासुदीचे दिवस असताना महावितरणचा या भोंगळ कारभारामुळे शहरवासियान मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरण ने विद्युत साहित्य दुरुस्ती कामे केले. तर या डीपी डीपीत स्पार्क होवुन आग लागल्या सारखे का परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी संबंधित अभियंता ठेकेदारावर कारवाई होणार का नाही असा सवाल केला जात आहे.