धाराशिव (प्रतिनिधी)- विविध सामाजिक क्षेत्रात काम करत फिजीशियन म्हणून नावारूपाला आलेले डॉ. राधाकृष्ण कुंजूलाल भन्साळी (वय 75) यांचे अल्प आजाराने गुरूवार दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले होते. त्यांच्यावर शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी धाराशिव येथील कपीलधार येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरीबाचा डॉक्टर म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. राधाकृष्ण भन्साळी यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासात्मक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. रोटरी क्लब, महेश्वरी पंचायत आदी विविध संघटनेत त्यांनी अनेक पदे भुषवली. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, भावजय, दोन मुले, एक मुलगी, पत्नी, सुना, पुतणे, नातवंडे असा आहे.