नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरातील नागरिक खड्ड्यातील रस्त्यातून चालत असताना शहरात नवीन रस्त्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन शहरातील रस्त्याकडे दुर्लक्ष करून जगताप नगर मध्ये गेल्या सहा महिन्यात खासदार निधीतून करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर पुन्हा नव्याने काँक्रीट रस्ता करून नगरपालिका प्रशासन काय साध्य करत आहे. असे रस्ते करून पालिका प्रशासन कोणाचे हित जपत आहे. असा सवाल नागरिकांतून होत असून, नगरपालिकेने शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. सहा महिन्यातच नव्याने रस्ता करण्यात आल्याने नगरपालिका प्रशासनाचे मनमानी कारभार चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे यात दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून झालेल्या खर्चाची वसुली करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी होत आहे.
गेल्या सहा महिन्यात खासदार निधीतून येथील जगताप नगर मध्ये रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यात आले होते. पुन्हा त्याच रस्त्यावर नगरपालिका प्रशासनाने नव्याने सिमेंट रस्ता तयार केला आहे. या रस्त्यासाठी खासदार निधीतून सहा महिन्यापूर्वी सात लाख रुपये खर्च केलेले वाया गेले आहेत. एकीकडे शहरांमध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण डबक्यामध्ये साचलेल्या पाण्यातून एखादी मोटर सायकल किंवा चार चाकी वाहन गेले तर ते पाणी नागरिकांच्या अंगावर कधी उडेल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत शहरातील नागरिक दररोज दिवस काढत आहेत. त्यामुळे शहरामध्ये नव्याने रस्त्याचे सिमेंट करण करावे अशी मागणी गेल्या वर्ष दीड वर्षापासून होत असताना नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे. हे शहरातील नागरिकांना कळून चुकले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचे मनमानी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. पालिका प्रशासनाला शहरातील कोणताही नेता जाब विचारण्याची ताकद कोणामध्ये नाही याची चांगलीच जाणीव पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना झाली असल्याने त्यांचा सध्या नळदुर्गमध्ये प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनमानी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शहरातील नागरिकांनी शहरांमध्ये रस्ते करावे अशी मागणी करीत असताना या मागणीचा कोणताही विचार न करता कोणाचे तरी हित जपण्यामध्ये पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनातील एका अधिकाऱ्याचे हित जपण्यासाठी शहरातील रस्ते न करता शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी मागणी नसताना स्वतःच्या मनमानी कारभाराने पुन्हा अशा ठिकाणी केलेल्या कामावर रस्ते करण्याचा घाट घातला जात आहे. येथील जगताप नगर मध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी खासदार निधीतून सुमारे सात लाख रुपये खर्चून रस्त्याचे सिमेंट करण करण्यात आले होते. मात्र त्याच रस्त्यावर गेल्या महिन्यात पुन्हा नव्याने रस्त्याचे सिमेंट करण करण्यात आले आहे, एखाद्या रस्त्याचे काम झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षानंतर त्या ठिकाणी रस्त्याचे काम केले जाते असा नियम पालिका प्रशासनातून नागरिकांना सांगितला जातो. मात्र सहा महिन्यापूर्वीच केलेल्या रस्त्यावर पालिका प्रशासन पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून पालिका प्रशासनाने संबंधित विभागाकडून पुन्हा रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. यामुळे पालिका प्रशासनाचे काय गौड बंगाल आहे. हे शहरातील नागरिकांना न करण्याइतके खुळे नाहीत, त्यामुळे या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून यामध्ये दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्याकडून नव्याने करण्यात आलेल्या कामाच्या रकमेची वसुली करून घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.