धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील टाकळी (बे.) येथील व सध्या धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवेत कार्यरत असणारे व सामाजिक क्षेत्र आणि साहित्यिक प्रा. राजा जगताप यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी ताई काळभोर पुणे यांनी नियुक्तीचे पञ देऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे.
प्रा.राजा जगताप हे सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात व साहित्य क्षेञामध्ये सातत्याने लेखण करत आहेत. ते सध्या महाराष्ट्रामध्ये कथाकार, कादंबरीकार व समीक्षक अशी त्यांची ओळख निर्माण झाल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. प्रा.राजा जगताप यांचे साहित्य लेखन हे नियमितपणे विविध वर्तमानपत्रातून चालू असते. साहित्य क्षेत्रामध्ये प्रा.राजा जगताप यांनी चांगले लेखन केल्याने त्यांच्या लेखनाची दखल घेऊन त्यांना हे पद दिलेले आहे. प्रा. राजा जगताप यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने धाराशिव शहर व ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया प्रा.राजा जगताप यांनी दिली आहे.
