धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊसाचे फेब्रुवारीपासूनचे ऊसबील अद्यापही शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. तसेच काही साखर कारखान्यांनी ऊसाचे अंतीम देयकेही आजतागायत दिलेले नाहीत. ऊस बील न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थीक संकटामध्ये सापडला आहे. त्यामुळे सदरील कारखान्याची साखर जप्त करुन ऊसाची एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे आठ दिवसात द्यावेत, अन्यथा संबंधीत साखर कारखान्याच्या विरोधामध्ये लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिली आहे.

याबाबत पुणे साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांना मंगळवारी दि.5 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात संजय पाटील दुधगावकर यांनी म्हंटले की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊसाचे फेब्रुवारी पासूनचे ऊस बील अद्यापही शेतकऱ्यांना दिलेले नाही. तसेच काही साखर कारखान्यांनी ऊसाचे अंतीम देयकेही आजतागायत दिलेले नाहीत. ऊस बील न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थीक संकटामध्ये सापडला आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या साखर कारखान्यांनी ऊसाचे अंतीम बील शेतकऱ्यांना दिलेले नाही. अशा सर्व साखर कारखान्याची साखर जप्त करुन शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे बील येत्या आठ दिवसात देण्यात यावे. अन्यथा संबंधीत साखर कारखान्याच्या विरोधामध्ये लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी दिला आहे.

 
Top