तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील बसस्थानक समोर असलेल्या लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि. सोलापूर शाखा तुळजापूर येथील बँकेचे कुलुप तोडुन बँक मध्ये ठेवलेले 34 लाख 60 हजार 806 रुपये रोख रक्कम दत्ता नागनाथ कांबळे याने चोरुन नेल्याची घटना रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी घडली. 

या बाबतीत ब्रँच मँनेजर सुनिल सांळुके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दत्ता नागनाथ कांबळे, रा. धारुर ता. जि. धाराशिव यांनी रविवार दि. 03 रोजी 12.30ते 13.34  वाजण्याच्या सुमारास लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि. सोलापूर शाखा तुळजापूर येथे कार्यरत असताना बॅक शाखेच्या शटरचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करुन बॅक मध्ये ठेवलेले एकुण 34 लाख 60 हजार 806 रोख रक्कम चोरुन नेली. अशी  फिर्याद  सुनिल माणिकराव साळुंके, व्यव- ब्रॅच मॅनेजर लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि. सोलापूर शाखा तुळजापूर यांनी सोमवार दि. 4 ऑगस्ट रोजी  दिल्यावरुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (4)331 (3) 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top