भूम (प्रतिनिधी)-  महाराष्ट्रात महसूल विभागात धाराशिव जिल्हा सर्व कामांमध्ये अग्रेसर राहिला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये महसूल दिन भूम येथील राम हरी मंगल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौम्यश्री पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष, ज्योती पाटील, शोभा जाधव, प्रभारी उपविभागीय अधिकारी जयवंत पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, नायब तशिलदार, पुरवठा निरीक्षण अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, शिपाई, वाहन चालक, महसूल सेवक, पोलीस पाटील, कोतवाल उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत आलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. पाच ग्राम महसूल अधिकाऱ्यांना मंडळ अधिकारी, सात शिपाई यांना सहाय्यक, जिल्ह्यातील दोन मंडळ अधिकारी यांचे नायब तहसीलदारपदी पदोन्नती करण्यात आली. तर या वर्षभरामध्ये उत्कृष्ट कामे केलेल्या उत्कृष्ट अधिकारी उत्कृष्ट कर्मचारी यांचा व त्यांच्या पाल्यांचा अभिनंदन पत्र देण्यात आले. यामध्ये तीन अधिकारी, 39 कर्मचारी, 6 पाल्य जिल्हाधिकारी धाराशिव यांचा हरित धाराशिव अभियान व आकांक्षित जिल्हा उपक्रमामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महसूल परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. कर्मचारी यांचा ताण तणाव कमी करण्यासाठी महसूल दिनाच्या निमित्ताने हास्यरंग फैम दीपक देशपांडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन जयवंत रावजी पाटील तहसीलदार भूम व तहसील कार्यालय भूम यांच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मृणाल जाधव यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये अपर जिल्हाधिकारी धाराशिव यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व संघटनाचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयवंत पाटील यांनी केले.

 
Top