भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे चिंचोली येथे भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन व असंख्य पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश सोहळा राज्य परिषद सदस्य तथा विधानसभा प्रमुख  बाळासाहेब क्षीरसागर व भूम तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. रविवार दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी  चिंचोली, तालुका भूम येथे भाजपच्या शाखा उद्घाटनानंतर तालुक्यातील इतरही काही गावात शाखा उद्घाटनाचे नियोजन केले.

चिंचोली येथिल शाखा उदघाटन प्रसंगी शहर मंडळ अध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस रघुनाथ वाघमोडे, सरचिटणीस बिभीषण पवार, सरचिटणीस आबासाहेब मस्कर, अ.जा. मोर्चा तालुकाध्यक्ष दिनकर कांबळे, मा. ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, भटके विमुक्त तालुकाध्यक्ष शिवाजी उगलमुगले, चिटणीस नीलेश शेळके, कामगार मोर्चा शहर अध्यक्ष महादेव शेंडगे, शहर उपाध्यक्ष श्रीपाद देशमुख, शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष शुभम खामकर, युवा नेते सिद्धार्थ जाधव. आकाश शेटे, सुबराव शिंदे अमोल लोंढे याची उपस्थिती होती. नूतन शाखेचे अध्यक्ष बाबुराव साळुंखे, शाखेचे उपाध्यक्ष मारुती वारे, सचिव  रणजित वारे, कोषाध्यक्ष  नवनाथ शिर्के, सदस्य शरद पवार, नवनाथ पवार, भीमा वारे, शेषेराव साळुंखे, भरत पवार, महादेव वारे आणि असंख्य ग्रामस्थांनी पक्ष प्रवेश केला व शाखेचे उद्घाटन पार पडले.

 
Top