तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने जून 2025 महिन्यातील सर्वसमावेशक प्रतिपूर्तीपोटी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला तब्बल 543.71 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, ही रक्कम 2025-26 या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक बी-3 अंतर्गत विविध लेखाशिर्षकांवर वर्ग करण्यात येणार आहे. यात वाहनांशी संबंधित, संचालन व प्रशासन तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाशी निगडित खर्चाचा समावेश आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना या निधीची मागणी करून तो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

 
Top