धाराशिव (प्रतिनिधी)- नांदेड येथे संपन्न झालेल्या समरसता साहित्य संमेलन मध्ये धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्य युवराज नळे यांना 'तिच्या कविता' या काव्यसंग्रहाबद्दल दि. 03 ऑगस्ट रोजी जेष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या शुभहस्ते 'राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्काराने' सपत्नीक सन्मानित करण्यात आले. 

या प्रसंगी समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ ईश्वर नंदापुरे, माणिक भोसले, कार्यवाह डॉ प्रसन्न पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 'तिच्या कविता' हा काव्यसंग्रह स्त्रीच्या वेगवेगळ्या रूपांचे शब्दांकन असून समस्त स्त्री आणि पुरुष वर्गातही हा काव्यसंग्रह अत्यंत लोकप्रिय झाला आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक रचना 'ती'ला समर्पित असून अनेक दाहक वास्तवतेचेही चित्र या काव्यसंग्रहातून नजरेसमोर उभे राहते. म्हणूनच तज्ञ समितीने परीक्षणाच्या निकषावर राज्यस्तरीय समरसता पुरस्कार साठी तिच्या कविता काव्यसंग्रहाची निवड केली आहे असे संयोजकांनी सांगितले.  जेष्ठ साहित्यिक युवराज नळे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल समाजाच्या सर्व स्तरातील प्रतिष्ठित मंडळींकडून अभिनंदन होत आहे.

 
Top