धाराशिव (प्रतिनिधी)- हनुमंत नगर मौजे आळणी येथील हनुमंत मंदिरात अमोल अरुणराव घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्याची बैठक होऊन पुढीलप्रमाणे धाराशिव तालुका कार्यकारणी निवडण्यात आली.
अध्यक्ष: श्याम सुंदर पांडुरंग लावंड, सचिव: प्रा. विनोदकुमार शिंदे, कोषाध्यक्ष जीवनराव तांबे, सदस्य: संकेत लक्ष्मणराव पडवळ (उपळा), सदस्य: बाळासाहेब केशवराव वीर (आळणी), सदस्य: प्रकाश गणपती सोनार (जवळे ,दुमाला), सदस्य: योगेश गणेश तोर (आळणी), सदस्य: त्रिंबक कृष्णा जमदाडे (अनसुरडा), सदस्य: विलास पवळे (खामगाव), सदस्य: संतोष इंगळे यावेळी प्रा.अर्जुन जाधव (मराठवाडा केंद्रीय कार्यकारणी सदस्य) श्री अमोल राव अरुणराव घोगरे मुख्याध्यापक जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीने धाराशिव तालुक्यामध्ये येत्या दोन महिन्यात किमान 25 गावांमध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती नूतन अध्यक्ष श्यामसुंदर लावंड यांनी दिली. याच बैठकीमध्ये हनुमान नगर मौजे आळणी या ठिकाणी एसटी महामंडळाने बस थांबा मंजूर केलेला आहे. परंतु कंडक्टर आणि ड्रायव्हर या ठिकाणी बस थांबविण्यास टाळाटाळ करतात प्रवाशाशी उद्धट भाषा करतात. एप्रिल 2025 मध्ये लातूर येथील एसटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना हनुमान नगर मौजे आळणी या ठिकाणी बस थांबविण्यास सक्त सूचना केलेली आहे. बस न थांबविल्यास प्रवाशाची तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा आदेश काढलेला असताना सुद्धा ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या वर्तनामध्ये काही बदल झालेला नाही.
त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे या विरोधात आंदोलन करण्याचा ठराव सदर बैठकीत घेण्यात आला. यावेळी मराठवाडा जनता विकास परिषद तुळजापूर कार्यकारिणीचे सदस्य श्री सुधाकर जमदाडे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.