धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांची प्रभारी प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी महाविद्यालय, परंडा येथील प्राचार्य डॉ. तुकाराम लोखंडे, मुख्याध्यापक मधुकर शेळके (बार्शी) यांच्याकडून सत्कार करण्यात आला.व भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे, डॉ. संभाजी धुमाळ, डॉ.दयानंद हाके आदी सह गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
