कळंब (प्रतिनिधी)- पुर्वीचे अनेक जुन्या चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तसाच एखाद्या चित्रपटात माणूस समाजातील विविध अडचणी सामना करण्यासाठी लढाई करतो व त्यावर मात करतो व शेवटी जिंकतो असे अनेक चित्रपट होवून गेले.
परंतु आजच्या घडीला मुंबापुरीत आरक्षण लढ्यासाठी ठिय्या मांडून बसलेल्या आपल्या समाजबांधवांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी थेट कळंब येथून मुंबईला खाद्यसामग्रीची 'रसद' पुरवली जात असून घरोघरी थापलेया भाकरी , कांदा-चटणी, बिस्किटं ते अगदी औषधी इथवरचं साहित्य घेऊन शनिवारी रात्री तीन मालवाहू वाहन रवाना झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत . या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कळंब शहर व ग्रामीण भागातील विविध गावातून हजारोंच्या संख्येत समाजबांधव मुबई येथे दाखल झाले आहेत. सध्यस्थितीत मुंबापुरीत ठिय्या मांडून बसलेलया या समाजबांधवांची खाण्याची आभाळ होत असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर कळंब येथून मदतीसाठी अनेकांचे हात पुढे आले आहेत. या अनुषंगाने शनिवारी दुपारनंतर 'एक घर ,दोन भाकर ' असा संदेश फिरला . यातून शहरासह ग्रामीण भागातून अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सांयकाळी 8 वाजेपर्यत यातील मदत कळंब येते दाखल झाली. ती संकलित करून रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाली.
भाकरी ते बिस्कीट आपल्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांची आभाळ होऊ नये, यासाठी कोणी घरात थापलेल्या भाकरीच गाठोडं आणलं तर कोणी बिस्किटांच्या बॉक्सची थाप्पी लावली, कोणी औषधी आणलीं तर कोणी फरसाण अन् चिवडा. कोणी पाण्याच्या बाटल्या दिल्या तर कोणी चटणी अन कांदा . काही क्षणातच तीन मालवाहू वाहन खाद्य सामग्रीने गच्च झाले.

