धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीकृष्ण गणेश मंडळ, गवळी वाडा, धाराशिव “ऑपरेशन सिंदूर“ या देखाव्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस ठाणे, धाराशिव शहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, चंद्रसेन देशमुख, अभिमान हंगरगेकर, किशोर माळी, मल्लिकार्जुन सोनवणे, किरण कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंडळाची यशोगाथा व देखाव्याच्या संदर्भातील माहिती पुस्तकाचे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यानंतर खो - खो खेळाचे प्रशिक्षक प्रविण बागल यांना सन 2024-25 मधील श्री. शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस हवलदार दिपक लाव्हरेपाटील यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. तसेच खो खो चे प्रशिक्षक प्रभाकर काळे यांचा देखील सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. यानंतर परिसरातील इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण झालेले तसेच स्कॉलरशिप, एम.टी.एस, ए.टी.एस. या स्पर्धा परिक्षेत मिरीटमध्ये आलेले एकुण 25 गुणवंत विद्यार्थ्यांचा व खेळाडुंचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देवुन सत्कार करण्यात आला. कुमार दराडे यांनी यावेळी मंडळाचे उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी चंद्रसेन देशमुख यांचे ही भाषण झाले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष शितल देशमुख, उपाध्या अभिषेक बागल व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुरेश गवळी यांनी केले.
