तुळजापूर (प्रतिनिधी)- अक्कलकोट ते तुळजापूर या दोन तिर्थक्षेत्रांना जोडणारा तुळजापूर-मंगरुळ - अक्कलकोट या मार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावरील मंगरुळ पाटी ते नादुंरी  पर्यंतच्या रस्त्यावरजागोजाग मोठमोठले  पडलेले खड्डे प्रवाशांना मुत्युचा दारी नेणारे ठरणार आहे. सदरील रस्ता अपघातप्रवण बनला असून येथून ये जा करताना वाहनधारकांना विशेषता दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सदरील रस्ता तात्काळ दुरूस्त करावा अन्यथा संबधित ठेकेदारावर कारवाई करावी. अशी  या रस्त्याची सातत्याने दुरुस्ती केली जात असल्याचे समजते. त्यामुळे हा रस्ता प्रवाशांन साठी जीवघेणा बनला असला तरी अधिकारी वर्गासाठी सोन्याची अंडी देणारी ठरल्याची चर्चा या मार्गावरील ग्रामस्थ व वाहन चालकामधुन चर्चिली जात आहे. सदरील रस्ता दुरुस्ती  खर्चा बाबतीत  माहीती मागितली असता अर्ज करा म्हणतात नंतर विविध कारणे सांगुन अधिकारी माहीती देण्यास टाळाटाळ करतात. तरी या रस्ताच्या पाच वर्षाचा दुरुस्त खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.


 
Top