तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसरातुन मराठा आरक्षण आंदोलनाना हजारो बांधव आंतरवाली मार्ग मुंबई कडे रवाना झाले. यावेळी गणपती बाप्पा मोरया! या जयघोषासोबत “आता कुठे जायचं? मुंबईला जायचं! हम सब जरांगे!“ अशा घोषणांनी तुळजापूर दणाणून गेला.
एका बाजूला मराठा घराघरात श्रीगणेशाचे आगमनाची तयारी सुरू होती तर दुसऱ्या बाजूला घरातील पुरुष मंडळी मुंबईकडे आंदोलनासाठी निघण्याची लगबग दिसून आली. 1036 वाहनांतून मराठा बांधव मुंबईकडे रवाना पहाटेपासूनच अनेकांनी श्री तुळजाभवानी मातेचे राजेशहाजी महाध्दार समोरुन तसेच धाराशिव रस्त्यावरून देवीला हात जोडून व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून आंतरवलीसाठी प्रयाण केले. यामुळे तुळजापूरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवार, दि. 27 ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन आणि त्याच दिवशी मराठा समाजाचे आंदोलन, या दोन घटनांनी तालुका अक्षरशः ढवळून निघाला. आंदोलनासाठी शहरासह ग्रामीण भागातून असंख्य मदतीचे हात पुढे आले. विशेष म्हणजे, नेहमी एकमेकांवर टीका करणारे सर्वच पक्षातील नेते या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना मदतीसाठी पुढे आले.
मराठा सेवकांनी आवाहन केले होतेष“रोख रक्कम नको, पण तुमच्या गावातील, प्रभागातील मुंबईला जाणाऱ्या मराठ्यांना तुम्हीच आर्थिक मदत करा.“ त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागातुन मोठ्या संखेने आंदोलक काही आंतरवाली तुन काही विविध मार्गाने शिवनेरी कडे जुन्नर मार्ग रवाना झाले. तुळजापूर तालुक्यातील व्यापारासाठी बाहेरगावी असणाऱ्या व्यापारी व मेडीकल दुकानदारांनी यासाठी अर्थिक मदत केली. तर पेट्रोल पंप चालकांनी आंदोलनाच्या वाहनांना दरात सूट देत आपला सहभाग नोंदवला. तुळजापूर, धाराशिव महामार्ग भगव्या झेंड्यांनी सजला होता. हजारो गाड्या निघाल्याचे दृश्य पाहून संपूर्ण परिसर आंदोलनी रंगात रंगला. “श्रीगणेश उत्सव सणसुदीचे दिवस असताना मराठा बांधव शिधा घेऊन आरक्षणाच्या लढाईसाठी आंतरवाली व जुन्नर, मुंबई भगवी मिरवणूक काढत रवाना झाले.