तुळजापूर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचावर टीका करुन त्याला जातीवादाचा रंग दिला. महाविकास आघाडीच्या भूमिकेमुळे मराठ्यांचे आरक्षण टिकले नाही. माञ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले. मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडी नेत्याबद्दल का बोलत नाही असा सवाल जलसंपदा मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

धाराशिव जिल्हयाला सध्या मराठवाडा सिंचन योजनेतुन सात टीएमसी पाणी देतोय. माञ आपल्याला 23 टीएमसी पाणी आणायाचे आहे. त्यामुळे गतीने काम करावे लागेल. असे स्पष्ट करुन जिल्हयातील पाच भागात 26 हजार ऐकर पाणी देण्याचे निश्चीत केल्याचे सांगुन माञ पाणी केव्हा येणार या प्रश्नाला बगल दिली.  

जलसंपदा मंञी राधाकृष्ण विखे यांनी श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर पञकारांशी बोलताना म्हणाले कि, जिल्हयाला 23 टीएमसी पाणी आणायाचे आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गती दिली. हा प्रकल्प लवकरच पुर्ण होईल असे यावेळी म्हणाले. मतचोरी आंदोलनावरुन खासदार राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी विखे पाटील यांनी आपल्या वडिलांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी कशा प्रकारे दबावाचे राजकारण केले त्यामुळे आता सध्याही त्यांना निवडणुकीतील मताचे राजकारण स्वतः सारखे वाट आहे. अशी टिका विखे पाटील यांनी केली. तर काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असल्याने राहुल गांधी वैफल्यग्रस्त झाल्याची टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वनेता बनल्याचे स्पष्ट केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नितीन काळे उपस्थितीत होते.

 
Top