धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव अंतर्गत नीट/आयआयटी, जेईइ तयारी वर्ग गुरुवर्य के .टी. पाटील फाउंडेशन मार्फत क्रांती दिन व 79 वा स्वातंत्र्य दिन याचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी यांच्यावर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर वेशभूषा स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस प्रेमाताई पाटील उपस्थित होत्या. तर शम्स उलूम उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. सदर कार्यक्रमासाठी प्रशालाचे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशन प्रमुख डॉ.व्ही.जी. आंबेवाडीकर यांनी व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जे .बी. शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू सारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा करून स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक सानवी चव्हाण (राणी लक्ष्मीबाई), द्वितीय जान्हवी कुलकर्णी (सावित्रीबाई फुले), तृतीय नैतीक जमदाडे (महात्मा गांधी) प्राप्त केले. परीक्षक म्हणून फिजिक्स फॅकल्टी विशाल कुमार व मॅथ्स फॅकल्टी ज्योती सिंग यांनी काम पाहिले. सदर वेळी गुरुवर्य के. टी. पाटील जयंतीनिमित्त मागील वर्षी आयोजित आंतरशालेय विज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण ही पार पडले. आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक गुरुवर्य के. टी. पाटील फाउंडेशन वर्गातील विद्यार्थी कु. आयुष कांबळे, वेदांत घोडके,सुशांत राऊत, वेदांत घोडके यांनी तयार केलेल्या मंगळावर पाणी व जमीन परीक्षण करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या उपकरणाला प्राप्त झाला. द्वितीय क्रमांक शम्स उलूम माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीनी सय्यद आफरीन आरिफ, पठान हुजैफा तौफीक, शेख मानताश मोहम्मद अखिलुद्दीन यांनी प्राप्त केला. त्यांचे बक्षीस वितरण सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते रोबोटिक किट व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सत्यप्रकाश, श्याम मिश्रा, सचिन चव्हाण, धीरज लोमटे, पाचकुडवे, कुंभार, गायकवाड, नाईकवाडी, यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.
