धाराशिव (प्रतिनिधी) शिवसेना महिला आघाडी धाराशिव तालुकाध्यक्ष मायाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने रविकिरण प्राथमिक विद्यालय, दत्तनगर येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन महिला आघाडी संघटक किरणताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शहरप्रमुख आकाश कोकाटे, बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण डोलारे, उपतालुकाप्रमुख माणिक वाकुरे, उपतालुकाप्रमुख धनाजी साळुंके, तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजीनगर (सांजा) व जिल्हा परिषद प्रशाला कुंभारी येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप करण्यात आले. तालुक्यातील इतर शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या हातात बॅग देताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हेच या उपक्रमाचे खरे सार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. या कार्यक्रमाला अमरदीप सोनटक्के, नितीन इंगळे, विशाल धालगडे, दयानंद पवार, बालिका भुतडा, रुपाली इंगळे, विमल शिंदे, बैलवाडे काकू, जमीला तांबोळी, वनिता कांबळे, ज्योती लोखंडे, वर्षा गरड, सुलक्षणा गरड यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मायाताई चव्हाण म्हणाल्या की, “धाराशिव तालुक्यातील महिलांना काही अडचणी असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.