धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात तीन नवी पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक व साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन रमाकांत बाबुराव हाजगुडे यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, सुभाष गेनदेव चव्हाण यांची जिल्हा संपर्क सचिव तर सुरेश शिवाजी शेळके यांची जिल्हा संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

सदर नियुक्त्या दिनांक 31 डिसेंबर 2028 पर्यंत मान्य राहणार आहेत. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात साहित्याची गोडी वाढवून समाजजागृतीसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी कळभोर यांनी या नियुक्त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्थानिक साहित्यिक, शिक्षक आणि तरुण वर्गामध्ये या निर्णयाचे स्वागत होत असून, जिल्ह्यात साहित्यिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. परिषदेच्या माध्यमातून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध होईल आणि साहित्यप्रेमींचा सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

 
Top