धाराशिव (प्रतिनिधी)- येथील  मदरसा अहैया उल उलुम येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने विशेष उपक्रम अमीर भाई शेख यांच्या वतीनेशराबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबनासाठी दोन शिलाई मशीन देण्यात आल्या असून, दररोज दोन तास Story प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर समाजिक कार्यकर्ते आमीर शेख, भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष निहाल काजी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश संघटक खालील पठाण, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष अकबर पठाण, तसेच मौलाना रहमतुल्लाह साहब, मौलाना आयुब साहब, कारी निसार साहब, मौलाना हरून साहब औसा, शेख हुसेन साहब, मौलाना अकबर साहब आदी मान्यवर उपस्थित होते. भविष्यात मदरशामध्ये विद्यार्थ्यांना कंप्यूटर प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही या प्रसंगी अमीरशेख यांनी  दिली.


 
Top